Ad will apear here
Next
महाराष्ट्राचा विकासदर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज; २०१९-२०चा आर्थिक पाहणी अहवाल सादर


मुंबई :  महाराष्ट्राचा विकासदर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच, राज्याच्या स्थूल उत्पन्नात २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत दोन लाख ४५ हजार ७९१ कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा राज्याच्या २०१९-२०च्या आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, अर्थमंत्री अजित पवार यांनी पाच मार्च २०२० रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. सहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर ३.३ टक्के, तर सेवा क्षेत्राच्या वाढीचा ७.६ टक्के राहील, असे या अहवालात म्हटले आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीचा दर ३.१ टक्के राहील आणि खरीप हंगामातील पिकांमध्ये तृणधान्यांचे उत्पादन नऊ टक्क्यांनी, कडधान्यांचे उत्पादन तीन टक्क्यांनी, तेलबियांचे उत्पादन एका टक्क्याने, तर कापसाचे उत्पादन २४ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

रब्बी पिकांमध्ये तृणधान्यांच्या उत्पादनात ४३ आणि कडधान्यांच्या उत्पादनात २३ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच फलोत्पादन क्षेत्रात २४२.७१ लाख टन उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. उसाच्या उत्पादनात ३६ टक्क्यांची आणि रब्बी हंगामातील तेलबियांच्या उत्पादनात २४ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. 

(राज्याचा संपूर्ण आर्थिक अहवाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZXICK
Similar Posts
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : अर्थमंत्री अजित पवार यांचे भाषण - Live महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : अर्थमंत्री अजित पवार यांचे भाषण - Live Video
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे
मानवी साखळीतून सनदी लेखापालांना मानवंदना पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने ‘सीए’च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे तीन नव्या योजना मुंबई : देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना शतकाहून जास्त काळ सर्वसमावेशक बँकिंग सेवा देणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी १०१वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी या बँकेतर्फे तीन नवीन सुविधा दाखल करण्यात आल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language